समाजाने संघटित होऊन ख्रिश्चन समुदायाचे नेते श्री राजन नायर यांना आमदार बनवावे: दीपक केदार, ऑल इंडिया पँथर सेना.

समाजाने संघटित होऊन ख्रिश्चन समुदायाचे नेते श्री राजन नायर यांना आमदार बनवावे: दीपक केदार, ऑल इंडिया पँथर सेना.

मराठा, मुस्लिम, दलित समाजासोबत खांद्याला खांदा लावून चालणारे उच्चशिक्षित, प्राध्यापक, ख्रिश्चन समुदायाचे नेते श्री राजन नायर यांना समाजाच्या प्रगतीसाठी, विधानसभेत समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, भाजपा, बजरंग दल, आरएसएस कडून समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी निवडून द्यावे.


  भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार, त्यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा महाराष्ट्र, कारण त्यांनी सर्व जाती आणि धर्मांना एकत्र करून एक समाज निर्माण केला. आणि जो छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिकारी सूर्य ज्योतिबा फुले, संत मदर तेरेसा, पंडिता रमाबाई अण्णा भाऊ साठे यासारख्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा आणि कार्याचा नेहमीच आदर करणारे, जे प्रत्येक मुद्द्यावर आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातील आणि क्षेत्रातील लोकांशी बौद्धिकपणे बोलणारे आणि सर्व जाती आणि धर्माच्या लोकांशी बंधुभावाने राहणारे, जो ख्रिश्चन समुदायाविरुद्ध असंवैधानिक व्यक्तत्व करणारा भाजपा आमदार गोपीचंद पडलकर च्या विरोधात ख्रिश्चन समाज आणि समाजाच्या सर्व  सामाजिक नेत्यांसोबत, सांगलीपासून पिंपरी चिंचवड ते आझाद मैदानापर्यंत समुदायाचा आवाज उठवतो आणि समाजाला एकत्र करतो, सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना सोबत नेहमी आनंदी असणारे हसतमुख,प्राध्यापक श्री. राजन नायर, जर आपण त्यांना पुण्यातून किंवा महाराष्ट्रातील कुठूनही विधानसभेत पाठवले तर आज ख्रिश्चन समुदायावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध वादळ निर्माण होईल. 


  मी,  डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांवर चालणारा त्यांचा अनुयायी श्री. दीपक केदार, राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष, आपणांस आव्हान करतो.