डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ३५ जणांचे रक्तदान
KS News प्रतिनिधी राज लोखंडे सोलापूर
सोलापूर, दि. १७ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त नवसमता युवक क्रीडा मंडळ व आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही डी. व्ही. फडतरे विचार मंच, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने गौतम नगर, बुद्ध विहार, विजापूर नाका, सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मंडळाचे मार्गदर्शक आयु. आनंद फडतरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच डी. व्ही. फडतरे यांच्या प्रतिमेस सचिन कोलते व गौतम कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवसमता युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शिलरत्न सुरवसे, सचिव अजितकुमार साबळे, कार्याध्यक्ष राहुल साबळे, सहखजिनदार गिरीष उडानशिव, कीर्तीपाल घोडकुंबे तसेच डी. व्ही. फडतरे विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष कपिल शंखे, सचिव इंद्रजित कांबळे, विशाल फडतरे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी उदयकुमार साबळे, शशिकांत साबळे, मिलिंद फडतरे, प्रकाश गायगवळी यांचे मार्गदर्शन लाभले.