धुळे तेली समाजाच्या वधू-वर परिचय सोहळ्याचा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ

धुळे तेली समाजाच्या वधू-वर परिचय सोहळ्याचा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ
धुळे तेली समाजाच्या वधू-वर परिचय सोहळ्याचा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ

धुळे तेली समाजाच्या वधू-वर परिचय सोहळ्याचा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ

विशेष प्रतिनिधी : रूपाली मनोज बैसाने

धुळे : धुळे तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर परिचय सोहळ्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्साहात करण्यात आला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, धुळे विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार शरद पाटील, डॉ. तुळशीराम गावित, धुळे शहराच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी, कल्पना महाले, धुळे शहराचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, समाजाचे अध्यक्ष तथा माजी महापौर भगवान करनकाळ, धरणगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीला चौधरी, तळोदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना एकाच व्यासपीठावरून आपला भावी जीवनसाथी निवडण्याची संधी उपलब्ध करून देणे, पालकांना योग्य स्थळांची माहिती मिळवून देणे आणि समाजातील कुटुंबांमध्ये परिचय व संवाद वाढविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

वधू-वर परिचय मेळावे हे केवळ विवाह जुळविण्याचे माध्यम नसून समाजातील एकोपा, परंपरा, संस्कृती आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. धुळे तेली समाजाचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असून समाजातील युवक-युवतींसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.