मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

 ठाणे /प्रतिनिधी 
 
 मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
 मूळ मराठवाड्यातील आणि नोकरी, व्यवसायानिमित्ताने मुंबई, ठाणे,नवी मुंबई, भिवंडी, पालघर, मीरा-भाईंदर या भागात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे एक  मजबूत संघटन असावे. या संस्थेमार्फत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवावेत या स्तुत्य हेतूने मराठवाडा जनविकास परिषद सन 2010 मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून या संस्थेमार्फत वैद्यकीय शिबिर, मूळ मराठवाड्यातील मान्यवरांचा सत्कार, महिलांसाठी हळदीकुंकू असे नानाविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री  धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार संजय केळकर, माजी खासदार राजन विचारे, ह भ प बोधले महाराज, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या कार्यक्रमास हजेरी लावली आहे.
 दहावी, बारावी तसेच विविध परीक्षांमध्ये 75 टक्के वा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लवकरच ठाणे येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते  होणार आहे.
 यासाठी विद्यार्थ्यांची नावनोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची नावे आणि गुणपत्रिकेच्या झेरॉक्स संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे व्हाट्सअपद्वारे पाठवाव्यात. पदाधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक खालील प्रमाणे  :  डॉ अविनाश भागवत - 9987 366568, संजय पोलसाने- 7506 127770 आणि संतोष काशिद- 9320 003491.
 कार्यक्रमाचा तपशील संबंधितांना फोनद्वारे कळविला जाईल.