सिल्लोड तालुक्यात वीज पडून मृत्यू

सिल्लोड तालुक्यात वीज पडून मृत्यू
     सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.14, सिल्लोड तालुक्यात दुपारी झालेल्या
 वादळी वारा व विजांचा कडकडाट सोबत पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामध्ये वीज पडून तालुक्यातील चार जणांचा मृत्यु झाला. तर अन्य दोघे जण जखमी झाले.
 
        घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेवून घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच घडलेल्या दुर्दैवी घटने बद्दल शोक व्यक्त केला.
 
     आमदार अब्दुल सत्तार यांनी घडलेल्या घटनेचा तसेच वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश प्रशासनास दिले अशी माहिती देत पीडित शेतकऱ्यांनी धीर धरावा असे अब्दुल समीर म्हणाले.
 
    याप्रसंगी कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास पा. लोखंडे, कृउबा समितीचे संचालक भावराव लोखंडे, नॅशनल सह. सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे , माजी नगरसेवक शेख सलीम हुसेन, सत्तार हुसेन, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहमद हनिफ, सुनील पांडुरंग दुधे, राजेश्वर आरके, फहिम पठाण, मोढा बु, चे माजी सरपंच दीपक हावळे, संभाजी हावळे, गणेश ढोरमारे, सारोळा सरपंच मोहन गायकवाड, नारायण वराडे आदींची उपस्थिती होती.
--------------
 
     सिल्लोड तालुक्यात वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे 1 ) रंजना बापुराव शिंदे रा. मोढा बू. ता. सिल्लोड वय 50 वर्ष  02) मौजे सारोळा ता. यश राजू काकडे वय 14 वर्ष व रोहित राजू काकडे वय 21 वर्ष ( दोघे सख्खे भाऊ )
03) पिंपळदरी ता. सिल्लोड येथे  शिवाजी सतीश गव्हाणे
 
 विज पडून जखमी व्यक्तींचा तपशील 
01) जीवन सतीश गव्हाणे रा पिंपळदारी
02) मौजे खातखेडा येथे विशाल द्यानेश्वर शिंदे 
 
वीज पडून जखमी असलेले दोन्ही व्यक्ती सिद्धेश्वर हॉस्पिटल सिल्लोड येथे ऍडमिट आहेत. सिद्धेश्वर हॉस्पिटलचे डॉक्टर लोखंडे यांच्याशी बोलणे झाले असून दोघेही धोक्याच्या बाहेर आहेत उपचार सुरू आहे.