हिंगोलीत ४.५ तीव्रतेचा भूकंप

हिंगोलीत ४.५ तीव्रतेचा भूकंप
हिंगोलीत ४.५ तीव्रतेचा भूकंप

हिंगोली, दि. ३ ऑक्टोबर : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात आज सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचे धक्के हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जाणवले.

भूकंपाच्या धक्क्यामुळे जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत आवश्यक माहिती संकलित केली जात आहे.