इचलकरंजीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

इचलकरंजीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

इचलकरंजी, दि. १५ : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील आदिवासी फासेपारधी समाजाच्या ज्येष्ठ सदस्या गंगुबाई शिवराम काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी महानगरपालिकेच्या वतीने गंगुबाई काळे यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी फासेपारधी समाजबांधवांना आमंत्रित करून सन्मानित केल्याबद्दल समाजाचे अध्यक्ष मोहन काळे यांनी महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले.

या कार्यक्रमास सहायक आयुक्त सुनील शिंदे, रामचंद्र कांबळे, नितीन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, भांडार अधीक्षक गणेश शिंदे, उद्यान व वनसंवर्धन विभागप्रमुख प्रशांत आरगे, संगणक विभागप्रमुख अजय जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच मोहन शिवराम काळे, सुभाष चव्हाण, सोमनाथ काळे, शंकर चव्हाण, मल्लू चव्हाण, वसंत काळे, शंकर काळे, जिवा चव्हाण, शिवाजी चव्हाण, दत्ता चव्हाण यांच्यासह शहरातील आदिवासी फासेपारधी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.