मोहन राठोड यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी

मोहन राठोड यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी

कल्याण : अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी कल्याण येथील रेस्ट हाऊसमध्ये पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोहन चंदू राठोड यांची अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगलजी डोंगरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी तसेच संघटनेची भविष्यातील वाटचाल या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन चंदू राठोड यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगलजी डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, महिला प्रदेशाध्यक्ष सारिका शिंदे, कायदेशीर सल्लागार संतोष चव्हाण, महाराष्ट्र सचिव शरद घुडे, कार्याध्यक्ष सचिन बुटाला, ताबे, अमर शिंदे यांच्यासह विविध पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवर आणि पत्रकार बांधवांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.