इचलकरंजी मनपाच्या वतीने महापुरुषांना अभिवादन

इचलकरंजी मनपाच्या वतीने महापुरुषांना अभिवादन

इचलकरंजी, दि. १४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू आणि आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

महानगरपालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त सुनील शिंदे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त नितीन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, भांडार अधीक्षक गणेश शिंदे, उद्यान व वनसंवर्धन विभागप्रमुख प्रशांत आरगे, अधीक्षक संदीप जोशी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, नाईक हवालदार महादेव देसाई, मुकादम महेश बुचडे, सचिन शेडबाळे आदी उपस्थित होते.