देहरादुन दि. 08 - उत्तराखंडचे राज्यपाल महामहिम गुरमित सिंह यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये दीर्घ चर्चा झाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता, स्वांतत्र, बंधुत्वाचे विचार, त्यांनी दिलेले भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला प्रचंड श्रध्दा आणि अभिमान असल्याचे मत यावेळी राज्यपाल गुरमित सिंह यांनी ना. रामदास आठवले यांच्याकडे व्यक्त केले.
त्यांनी ना. रामदास आठवले यांची वक्तृत्वशैली अनोखी आहे. संसदेत आणि अन्य ठिकाणी त्यांनी केलेली भाषणे आपण आवडीने ऐकली आहेत. त्यांची अनोखी भाषणशैली आपल्याला आवडते. ना. रामदास आठवले यांचा प्रचंड दीर्घ प्रवास आहे. त्यांचा जीवन प्रवास तो त्यांनी आत्मचरित्र स्वरुपात लिहावा असा सल्ला राज्यपाल गुरमित सिंह यांनी ना. रामदास आठवले यांना दिला. राज्यपालांनी लिहलेली दोन पुस्तकेही त्यांनी ना. रामदास आठवले यांना भेट दिली. यावेळी बोलतांना त्यांनी आपले वडील सुध्दा सुभेदार होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल सुध्दा सुभेदार होते. आपल्याला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड श्रध्दा असल्याचेही राज्यपाल गुरमित सिंह यांनी सांगितले. आपल्या संघर्षमय जीवनावर पुस्तके लिहिली गेली आहेत का अशी विचारणा राज्यपालांनी आठवलेंना केली.