डॉ. हेलन केलर जयंती उत्साहात साजरी
सोलापूर प्रतिनिधी : नॅब संचलित मा. सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे डॉ. हेलन केलर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील सहाय्यक प्रशासन अधिकारी मा. श्री. नागेश धोत्रे सर यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅब संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अंकुश कदम सर होते. स्वागत गीत दयानंद चौगुले यांनी सादर केले. कार्यशाळेचे प्रमुख श्री. रामचंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून नॅब संस्थेची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणातून श्री. अंकुश कदम यांनी डॉ. हेलन केलर यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री. नागेश धोत्रे सर यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व तसेच डॉ. हेलन केलर यांच्या प्रेरणादायी कार्याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थी मनोगतात प्रिती सितारे, विद्या वाघमारे व पांडुरंग खरसडे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षता मोरे यांनी केले.
कार्यक्रमासाठी शुभम वांजरे व संदेश कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.