नॅब संचलित राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाईंड येथे डॉ. हेलन केलर जयंती साजरी
सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे ks news
नॅब संचलित राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाईंड येथे डॉ. हेलन केलर जयंती साजरी
नॅब संचलित, राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाईंड, सोलापूर येथे डॉ. हेलन केलर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अंध शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. सौरभ शिंगाडे यांच्या शुभहस्ते डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. अन्नपूर्णा साखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये डॉ. हेलन केलर यांची ओळख व त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.
विद्यार्थी मनोगतामध्ये कु. रेवती निगाणे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भैरप्पा कारभारी यांनी केले तर आभार प्रदर्शन शाहिस्तेनाज करजगी यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.