डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मलिकपेठ येथे भव्य स्त्री व बालरोग तपासणी शिबिर
KS news सोलापूर प्रतिनिधी राज लोखंडे
सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मलिकपेठ येथे भव्य स्त्री रोग व बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही डी. व्ही. फडतरे विचार मंच, सोलापूर व अमर भीम तरुण मंडळ, मलिकपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी हा उपक्रम पार पडला.
शिबिरात डॉ. मयुरी पाटील, डॉ. पृथा कल्याणी, डॉ. पवित्रा कसबे-दामोदरे यांनी महिलांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण करून पुढील उपचाराबाबत सल्ला व मार्गदर्शन केले. तसेच डॉ. जयप्रकाश पाटील यांनी बालकांच्या आरोग्य तपासणीसह आवश्यक मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये 80 हून अधिक महिलांनी आणि 50 हून अधिक बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमर भीम तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण कसबे, उपाध्यक्ष श्रीनिवास राशेराव, खजिनदार अक्षय कसबे, सचिव अमोल कसबे तसेच सत्याग्रही डी. व्ही. फडतरे विचार मंचचे अध्यक्ष कपिल शंके, सचिव इंद्रजीत कांबळे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी साकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राज लोखंडे यांच्यासह दत्ता कसबे, विकास कसबे, गुरुनंद कसबे, सुधाकर कसबे, संध्या कसबे, ममता कांबळे, मोनिका सर्वगोड, उज्वला कोन्हेरीकर, नूतन माने, राणी भोसले, दिव्या कसबे, अंजली कसबे, अनुराधा कसबे, संगीता कसबे, उषा कसबे, शितल कसबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.