पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताची उभारणी होत आहे - केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले
मुंबई / नवी दिल्ली दि. 23 - कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे, तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याबद्दल रिपब्लिकन पक्ष दिल्ली राज्य युनिटतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
ना. रामदास आठवले म्हणाले की, मी यशस्वी पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी गृहमंत्री श्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस , भाजप अध्यक्ष श्री. नितीन नवीन आणि भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि यापुढेही लोकसेवा, सामाजिक न्याय तसेच दिव्यांग आणि महिलांसह समाजातील दलित, वंचित आणि शोषित घटकांसाठी निष्ठेने काम करत राहीन.
ना. रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकार, महामानव डॉ. भीमराव आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत असून, या दिशेने माननीय पंतप्रधानांची वचनबद्धता आणि समर्पण अत्यंत प्रशंसनीय आहे. या प्रसंगी ना. रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एनडीए सरकार संविधान निर्माते बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे. ना. रामदास आठवले म्हणाले की, ते समाजातील दलित, वंचित, शोषित, अल्पसंख्याक आणि महिलांच्या हक्कांसाठी व कल्याणासाठी निष्ठेने काम करत राहतील.
ना. रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते आपले सर्वोत्तम प्रयत्न करत राहतील. ना. रामदास आठवले म्हणाले की, तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून माझी निवड हा समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि मी पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास' या संकल्पात सक्रियपणे सहभागी होईन.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्याने पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.