स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ राजाराम स्टेडियमवर

स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ राजाराम स्टेडियमवर
स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ राजाराम स्टेडियमवर

इचलकरंजी, दि. १३ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.४५ वाजता राजाराम स्टेडियम येथे महानगरपालिकेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभात महापौर उदय धातुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असून आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, सदस्य-सदस्या तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा, राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल तसेच शहरातील विविध खाजगी माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांतील एनसीसी व एमसीसी विद्यार्थ्यांच्या सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी शहरातील नागरिकांनी राजाराम स्टेडियम येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इचलकरंजी महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.