हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पनवेलमध्ये तिरंगा रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पनवेलमध्ये तिरंगा रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पनवेलमध्ये तिरंगा रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पनवेलमध्ये तिरंगा रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पनवेल, दि. १४ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्यावतीने सरस्वती महाविद्यालय इंजिनिअरिंग येथे विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तिरंगा रॅली आणि ‘वंदे मातरम्’ माहिती प्रदर्शनाचा समावेश होता. महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख कीर्ती महाजन, उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सरस्वती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख सुनीता पाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

‘वंदे मातरम्’ माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढा, राष्ट्रध्वज आणि देशभक्तीशी संबंधित माहिती देण्यात आली. त्यानंतर काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.

तिरंग्यासोबत सेल्फी काढून अभियानात सहभागी व्हा

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवावा. तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावी. तसेच #SelfieWithTiranga या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करून देशभक्तीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी केले.