दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिवस उत्साहात साजरा
सोलापूर : एन.ए.बी. संचलित मा. सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे छत्रपती शाहू महाराज जयंती तथा सामाजिक न्याय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यशाळेचे अधीक्षक श्री. रामचंद्र कुलकर्णी सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर येथील उद्योजक माननीय श्री. कुमार देवसानी सर उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. आकांक्षा भंडारे मॅडम यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री. कुमार देवसानी सर यांनी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक कार्याचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रामचंद्र कुलकर्णी सर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती देत सामाजिक न्याय दिनाचे कायद्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमासाठी रियाज मुल्ला सर, आकांक्षा भंडारे मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थिनी विद्या वाघमारे हिने आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षता मोरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी श्रीनिवास समदूर्ले, शुभम वांझरे, संदेश कांबळे यांनी सहकार्य केले.
छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांना अभिवादन करत कार्यक्रम उत्साहात पार पडला.