पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन*

पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन*

पुणे / प्रतिनिधी :सांस्कृतिक राजधानी असा नावलौकिक असलेल्या पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण आजपर्यंत निश्चित करण्यात आलेले नाही. ते करण्याचा आपला मानस असून त्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कार्यात कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले. 

बालगंधर्व रंग मंदिराच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित ,अलविरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत करण्यात आलेल्या बालगंधर्व महोत्सवात महापौरांच्या हस्ते रात्री बारा वाजता केक कापून रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले, बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. मंदार जोशी, अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दीपाली कांबळे,तृप्ती देसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबंधी देखील महापौरांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. बालगंधर्व रंगमंदिर ही कलाकार आणि कला रसिकांसाठी जिव्हाळ्याची ऐतिहासिक वास्तू आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कोणाचाही विचार नाही. कलाकार आणि रसिक या दोघांच्या सोयीसाठी अधिक सुविधा निर्माण करणे हाच पुनर्विकासाचा मुख्य हेतू आहे. हे सर्व बदल कलाकारांचा सल्ला घेऊन, त्यांना विश्वासात घेऊनच करण्यात येतील. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यात येणार आहे अशी समजूत कोणीही करून घेऊ नये, असे महापौरांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या सर्व सांस्कृतिक सभागृहांची नोंदणी पारदर्शक रीतीने ऑनलाइन पद्धतीने करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. त्याचप्रमाणे बालगंधर्व महोत्सवासाठी वर्षातील तीन दिवस बालगंधर्व रंगमंदिराच्या