राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडे विजापूर रोडच्या कार्यकर्त्यांनी मांडल्या समस्या
वाढदिवसाचा आनंद बाजूला ठेवत खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे धावल्या जनतेच्या मदतीला; विजापूर रोडच्या नागरिकांच्या समस्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर मांडल्या
KS News सोलापूर प्रतिनिधी राज लोखंडे
सोलापूर शहरातील जुना विजापूर गरिबी हटाव ते ए. जी. पाटील कॉलेज, विजापूर रोड परिसरातील रहिवासी व दुकानदारांनी अतिक्रमण हटाव मोहिमेबाबतच्या गंभीर समस्या माननीय खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडल्या.
दिनांक 18 मे 2026 रोजी खासदार ज्योती वाघमारे यांचा वाढदिवस असतानाही त्यांनी कोणताही वाढदिवस सोहळा साजरा न करता जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. प्रभावित नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी थेट ठाणे येथे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली आणि नागरिकांच्या अडचणींवर तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली.
स्वतःचा आनंद बाजूला ठेवून गोरगरीब नागरिकांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित कार्यकर्ते :
१) सईद तांबोळी
२) रमेश भोसले
३) दयानंद वाघमारे
४) विजय इंडीकर
५) उमेश भोसले
६) वैभव जवळकोटे
७) अभिजित जोगुरे
८) मिलिंद ठोंबरे सर
९) दीपक गायगवळी
१०) राजू माने
११) अस्लम शेख
१२) इलियास पटवेकर
“ताई, आपण आपला वाढदिवस साजरा न करता जनतेच्या समस्यांसाठी धाव घेतलीत, त्याबद्दल आम्ही सोलापूरचे सर्व कार्यकर्ते आपले मनःपूर्वक आभारी आहोत,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.