इचलकरंजीत स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ उत्साहात
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी राजाराम स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे, महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक आणि सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहण समारंभात महानगरपालिकेच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक तसेच शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनसीसी आणि एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. राजर्षी शाहू हायस्कूल, डीकेएएससी महाविद्यालय, आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, गोविंदराव हायस्कूल, गंगामाई हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, बापुजी साळुंखे हायस्कूल, मृगेन्द्र आण्णा सुलतानपुरे विद्यामंदिर आणि आदर्श विद्यामंदिर या संस्थांचा सहभाग होता.
यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी शहरवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महानगरपालिका सेवेतून यावर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तसेच हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि मान्यवरांचे सहकार्य लाभले.
यावेळी परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, महिला व बालकल्याण समिती सभापती रुपाली सातपुते, नगरसेवक तानाजी पोवार, रवी रजपुते, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेवक संतोष शेळके, नगरसेविका शशिकला कवडे, प्रियांका इंगवले यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिकांचे वारस, माजी सैनिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.