भिवंडी महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना निरोप

भिवंडी महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना निरोप
भिवंडी महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना निरोप
भिवंडी महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना निरोप

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सहा कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या वतीने निरोप देण्यात आला. महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त विवेक उगले यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमात स्टेनोटायपिस्ट सुस्मिता सुरेश तावडे, लिपिक ललीता काळुराम शिवदे, मुकादम वसंत काथोड भालेराव, सफाई कामगार पांडुरंग सखाराम गायकवाड, कैलास पुंजाराम शिरोडकर आणि भिमराव संभाजी पाटेकर यांना निरोप देण्यात आला.

यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.