प्रशिक विजय ओहोळ यांनी दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश

पुणे : दि. 13 मे 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून , के एस न्यूज चॅनेलचे व्यवस्थापकीय संपादक विजय ओहोळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रशिक विजय ओहोळ यांनी दहावीच्या परीक्षेत 77% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशिक विजय ओहोळ हा पुण्यातील विश्वकर्मा विद्यालय पुणे येथे शिकत होता. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ओहोळ परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहावीचे यश तुझ्या मेहनतीचे फळ आहे पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा .पुढेही असेच उंच भरारी घे मनःपूर्वक अभिनंदन!
शुभेच्छुक : के. एस. न्यूज नेटवर्क परिवार