पुणे, प्रतिनिधी - जेईई, सीयूईटी, नीट, ऑलिम्पियाड्स सारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक ज्ञान घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील अनेक विद्यार्थी क्लासेससाठी मध्यवर्ती पुण्यात येत होते. मात्र, आता या विद्यार्थ्यांना चिंचवड येथील काळभोर नगर येथे अत्याधुनिक शिक्षणाची व्यवस्था बाकलीवाल ट्युटोरियल्सने उपलब्ध केली आहे. यामध्ये शांतपणे अभ्यास करण्यासाठी वर्ग, व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी स्वतंत्र कक्ष, अनेक प्रशस्त असे एसी वर्गांसह अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या केंद्रामध्ये विशेषतः सायन्स अँड लॉजिक रूम असून यामध्ये विध्यार्थी अनेक प्रयोग करू शकतात आणि त्यांचे तर्क वाढविण्यासाठी विशेष गेम्स खेळू शकतात. या केंद्राचे उद्घाटन नुकतेच विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन दशकांहून अधिक काळ बाकलीवाल ट्युटोरियल्सचे विद्यार्थी अविरतपणे यशस्वी होत आहेत. पुण्यामध्ये बाकलीवाल ट्युटोरियल्सची ९ केंद्र उपलब्ध असून आणि आता त्यांचे खूप मोठे आणि चांगले केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झाले आहे. पिंपरी-चिंचवड भागाबरोबरच मोशी, चाकण, भोसरी, आकुर्डी, निगडी, रहाटणी, कासारवाडी भागातील विद्यार्थ्यांना या दर्जेदार शिक्षणाचा निश्चितच फायदा होणार आहे.
बाकलीवाल ट्यूटोरियलचे संचालक वैभव बाकलीवाल म्हणाले की, जेंव्हा मी आयआयटी मुंबई मधून पास होऊन कॅम्पस इंटरव्हूमध्ये सिलेक्ट होऊन टाटा मोटर्स पिंपरी येथे आयुष्यातील पहिली नोकरी केली. त्यामुळे पिंपरी या शहराबद्दल फार जवळीक निर्माण होऊन पिंपरीचे स्थान हृदयात निर्माण झाले आहे. या उद्योगनगरीत राहणाऱ्या नागरिकांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बाकलीवाल ट्यूटोरियलची शाखा पिंपरी-चिंचवड येथे सुरु करताना विशेष आनंद होत आहे. गेल्या काही वर्षात पिंपरी-चिंचवड मधील विद्यार्थ्यांनी पुण्यातील बीटीच्या शाखांमध्ये शिक्षण घेऊन शहराचे नाव उंचावले. येथील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेत याठिकाणी नवीन शाखा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.