मतदार नोंदणीसाठी २८ आणि २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे पुणे, दि. २६

मतदार नोंदणीसाठी २८ आणि २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे पुणे, दि. २६

पुणे, दि. २६ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांसाठी गणना अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासाठी २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, २८ नोव्हेंबर आणि रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गणना अर्जांचे वितरण आणि संकलन करण्यात येणार आहे. तसेच १० डिसेंबरपर्यंत अर्जांवरील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.

संबंधित मतदारांनी विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आवश्यक गणना अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.