वरहालदेवी घाटावर निर्माल्यापासून खत निर्मिती उपक्रम
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव विसर्जनादरम्यान वरहालदेवी घाट येथे निर्माल्य संकलन करून त्यापासून खत निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेल्या महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबागच्या श्री सदस्यांचा महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त मुख्य विक्रम दराडे आणि प्रभाग क्रमांक ३ चे सहायक आयुक्त नितेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेशोत्सव काळात संकलित होणाऱ्या निर्माल्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर करण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न करण्यात आले.