सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन' च्या मुंबई कार्यालयाचे बुधवार, 21 रोजी उद्घाटन

सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन' च्या मुंबई कार्यालयाचे बुधवार,  21 रोजी उद्घाटन

मुंबई, दि. १८ प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मुंबईतील वर्सोवा, अंधेरी पश्चिम येथील अंबेमाता मंदिरासमोर, १९१ आरामनगर, आरडीएक्स स्टुडिओ बंगला, पार्ट २ येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यास मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील असोसिएशनचे पदाधिकारी, पत्रकार, पत्रकारेतर कर्मचारी आणि हितचिंतक उपस्थित राहणार आहेत.

राज्याच्या विविध भागांतून कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या पत्रकारांना या कार्यालयाचा लाभ होणार आहे. असोसिएशनच्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वाचे ठरणार आहे.

असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विश्वस्त प्रा. डॉ. जयपाल पाटील, संस्थापक विश्वस्त आणि माजी अध्यक्ष डॉ. राम अग्रवाल, उपाध्यक्ष व विश्वस्त मिलिंद वैद्य, संस्थापक विश्वस्त आणि सरचिटणीस संजयकुमार जोशी, कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, विधी सल्लागार ॲड. ओंकार माने, मुंबई प्रदेश अध्यक्ष श्रीकृष्ण आयचित, सचिव दादासाहेब पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष भगवान परळीकर, उपाध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव, शिक्षण व विकास संचालक भूषण ओझरडे आणि नवनिर्मिती व विकास संचालक शिरीष शिवनगीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला असोसिएशनचे सभासद, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.