तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे सेवा संकल्प अभियान

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे सेवा संकल्प अभियान

अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३५ नवीन मालमत्ता हस्तांतरण नोंदी करण्यात आल्या आहेत. तसेच ४५ नवीन नळजोडण्या देण्यात आल्या असून, १२ विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय ६० महिला बचत गटांची नोंदणी करण्यात आली असून, नागरिकांना १८० जन्म मृत्यू प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

अभियानाच्या निमित्ताने शहरातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासोबतच प्लास्टिकमुक्त तळेगाव दाभाडे निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहनही करण्यात आले.

नागरिकांना सुलभ आणि जलद सेवा मिळावी, शासकीय योजनांचा व नागरी सुविधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती वाढावी, या उद्देशाने नगरपरिषदेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त शहर निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.