पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी
पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी

पनवेल,दि.06 : पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा आज दिनांक 06 ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयात स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी  विविध विषयांना मंजूरी देण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सदस्य,अतिरीक्त आयुक्त 1 गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त 2 महेशकुमार मेघमाळे, सचिव नानासाहेब कामठे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते , उपायुक्त ‍रवीकिरण घोडके, शहर अभियंता राजेश कर्डिले, उपसचिव अक्षय कद , उपमुख्य लेखा परिक्षक संदिप खुरपे, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 पनवेल महानगरपालिकेच्या सल्लागाराची ५ वर्षाकरीता (प्रथम ३ वर्ष व समाधानकारक पुर्ण झाल्यानंतर २ वर्षे मुदतवाढ) निवडसुचीचे विस्तार (Empanelment) करण्याचा विषय स्थायी समितीमध्ये स्थगित करण्यात आला.

 पनवेल महानगरपालिका हद्दीतील अंतिम भुखंड क्र. ४१४ मध्ये प्ले ग्राउंड (खेळाचे मैदान) केंद्र शासनाच्या "भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२२-२०२३" या योजनेच्या अंतर्गत विकसीत करणे, या कामाच्या कमी व अधिक Positive & Negative Variation -१ (Excess / Saving) बाबींना मान्यता मिळणेबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला.
 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती-अ, प्रभाग क्र. ०१ मध्ये तळोजा फेज-२ ते घोट कोयनावेळे पुलापर्यंत आर.सी.सी. गटाराचे बांधकाम करणे व रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा विषय ‍ समितीमध्ये रद्द करण्यात आला.

 पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समितीक, कामोठे येथील सेक्टर-१९, प्लॉट नं.१४ येथे शाळा बांधण्याचा विषय स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील अग्निशमन केंद्राला लागून ते अं.भु.क्र. ४१ पर्यंत डांबरीरस्ता व पावसाळी गटार बांधण्याचा विषय स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला.

 पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती "ड" मधील विविध ठिकाणी असलेल्या पनवेल महानगरपालिका मालकीच्या सर्व सार्वजनिक शौचालयांची आवश्यकतेनुसार दोन वर्षासाठी दुरुस्ती व नुतनीकरण करणे या कामाच्या सुधारित प्रशासकीय खर्चास मान्यता मिळणेबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये स्थगित करण्यात आला.

 पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडकोने विकसीत केलेल्या नविन पनवेल (पुर्व व पश्चिम) व काळुंद्रे नोडमधील मलनिःस्सारण वाहिन्यांची दोन वर्ष कालावधीकरीता आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण करणे या कामाच्या सुधारित प्रशासकीय खर्चास मान्यता मिळणेबाबतचा विषय स्थायी समितीच्या बैठकित स्थगित करण्यात आला.

 मे. देवीचंद लक्ष्मण चव्हाण, ठाणे यांचे कडुन अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निष्कासन करणेकामी अतिरीक्त १११ मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणेकामी कार्यादेश निर्गमित करणेबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला.

 पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांना स्वावंलबी व सशक्त बनवण्यासाठी, त्यांची व्यावसायिक व सामाजिक कौशल्ये वाढवण्याच्या उद्देशाने विविध प्रशिक्षण जाणीव व जागृती कार्यक्रम आयोजित करणेबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला.

 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील (सिडको नोड्स वगळता) पाणी पुरवठा विभागातील पंपाची सर्व्हिसिंग व दुरुस्ती करणेबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये स्थगित करण्यात आला.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणचे उद्यानांची व खेळाचे मैदाने इ. आवश्यकतेनुसार डागडुजी दुरुस्ती करणे या कामाच्या वाढीव रक्कमेकरीता (Excess/Saving) मान्यता मिळणेबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये स्थगित करण्यात आला.

 पनवेल महानगरपालिकेकरिता कार, जीप, इनोव्हा, रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक, रुग्णवाहिका व इलेक्ट्रिक (कार/जीप) वाहने वाहनचालकासह भाडेतत्वावर पुरविणे या ई- निविदेस पुढील ०४ महिने कालावधीकरीता मुदतवाढ देणेच्या अंदाजित खर्चास मान्यता मिळणेबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला.