पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती ग्रंथ प्रदर्शन

पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती ग्रंथ प्रदर्शन

पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीमार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त स्व. पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रस्ता, पुणे येथे दि. २४ जानेवारी २०२६ रोजी दु.१२.३० वा. मराठी पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले असून सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीमती स्नेहसुधा कुलकर्णी, साहित्यिक आणि प्रकाशक, निहार प्रकाशन, तसेच श्री शाम भुर्के, ज्येष्ठ साहित्यिक आणि पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य,  श्री राजीव नंदकर, लेखक, साहित्यिक आणि सहयोगी प्राध्यापक, यशदा पुणे, बाल लेखिका कु.आराध्या नंदकर श्रीमती आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका  इ. मान्यवर उपस्थित होते. सदर ठिकाणी भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले असून सर्व नागरिकांसाठी दि.२४/०१/२०२६ ते दि.२८/०१/२०२६ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेमध्ये प्रदर्शनास भेट देऊन मराठी भाषा संवर्धनामध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.