महापालिकेच्या वर्धापन दिन सप्ताहानिमित्त नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिन सप्ताहानिमित्त महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नंदादीप आय हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ एक्झिक्यूटिव्ह आणि आधार ब्लड सेक्टर यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन उपमहापौर अनिल डाळ्या व अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते आणि परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा आयुक्त रोशनी गोडे, रोटरी प्रेसिडेंट संतोष साधळे, सेक्रेटरी मयुर पाटील,प्रो. चेअरमन सतिश मेटे, डायरेक्टर विवेक हसबे, अनुप शेटे, अमित खानाज, सुरेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या शिबिरामध्ये प्रतिभा चौगुले,उत्कर्षा पाखरे, श्रेयश घाडगे यांच्या कडून नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गरज असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी आवश्यक सल्ला देण्यात आला. नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
महापालिकेच्या वर्धापन दिन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. भविष्यातही अशा लोकहिताच्या आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या शिबिराच्या आयोजनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक महाजन, रोटरीचे आशुतोष उत्तुरे, सहा आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर आदींसह महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.