मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजेश शिरवाडकर दाम्पत्याने घेतली सदिच्छा भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजेश शिरवाडकर दाम्पत्याने घेतली सदिच्छा भेट

मुंबई : भाजपा मुंबई दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आणि मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.

या भेटीदरम्यान शिरवाडकर दाम्पत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री सिद्धिविनायकाची सुंदर मूर्ती भेट दिली. तसेच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मदत मिळावी, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीच्या सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.