भारतीय पत्रकार संघ लिगल विंग (AIJ) महाराष्ट्र राज्याकडून साधना सहकारी बँक लि.चे नवनिर्वाचित चेअरमन श्री राजेश कवडे पाटील यांचा सन्मान.

भारतीय पत्रकार संघ लिगल विंग (AIJ) महाराष्ट्र राज्याकडून साधना सहकारी बँक लि.चे नवनिर्वाचित चेअरमन श्री राजेश कवडे पाटील यांचा सन्मान.

AIJ महाराष्ट्रकडून साधना सहकारी बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश कवडे पाटील यांचा सन्मान

पुणे : साधना सहकारी बँक लि., हडपसर (पुणे) यांच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघ लिगल विंग (AIJ) महाराष्ट्र राज्याच्या वतीने हडपसर येथील मुख्य कार्यालयात श्री. राजेश कवडे पाटील यांचा शाल व AIJ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या सन्मान सोहळ्याला भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. ॲड. कैलासराव पठारे-पाटील, राज्य उपाध्यक्ष तथा दि पुणे लॉयर्स कंझ्युमर को-ऑप. सोसायटीचे माजी चेअरमन मा. ॲड. पांडुरंग ढोरे-पाटील, पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष तथा AIJ महाराष्ट्र महासचिव मा. ॲड. योगेश तुपे-पाटील, राज्य संघटक मा. ॲड. हेमंत भांड-पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष मा. ॲड. प्रविण गोरे, भोर तालुका अध्यक्षा ॲड. सौ. सुरेखाताई बांदल, मुंढवा गावचे उद्योजक श्री. दिलीप बा. लोणकर पाटील व उद्योजक श्री. बजरंग तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. राजेश कवडे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्याच्या विविध सामाजिक व विधी क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या शेवटी AIJ महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी साधना सहकारी बँक लि., हडपसर पुणेचे नवनिर्वाचित चेअरमन श्री. राजेश कवडे पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण व गौरवपूर्ण वातावरणात पार पडला.