सोलापूरमध्ये मुस्लिम वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधीची मागणी

सोलापूरमध्ये मुस्लिम वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधीची मागणी

KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे 

सोलापूर शहरातील मुस्लिम वस्तीत धार्मिक स्थळे, कब्रस्तान विकास व ड्रेनेज व्यवस्थेच्या सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम वस्तीत नागरिकांची घनता मोठ्या प्रमाणावर असून, त्या भागात मूलभूत नागरी सुविधांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. विशेषतः धार्मिक स्थळे (दर्गा) व कब्रस्तानांच्या विकासाचा अभाव, तसेच अपुरी व जुनी ड्रेनेज व्यवस्था यामुळे नागरिकांना स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर परिसरातील दर्गा व कब्रस्तान ही केवळ धार्मिक श्रद्धेची स्थळे नसून, सामाजिक ऐक्य व सांस्कृतिक परंपरेची जपणूक करणारी केंद्रे आहेत. मात्र, सध्या या ठिकाणी आवश्यक त्या पायाभूत सुविधा जसे की कंपाऊंड भिंत, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता सुविधा, वृक्षारोपण इत्यादींचा अभाव आहे. त्यामुळे या सर्व स्थळांचा विकास तातडीने होणे अत्यावश्यक आहे.

तसेच, मुस्लिम वस्तीत अस्तित्वात असलेली सध्याची 6 इंच क्षमतेची ड्रेनेज लाईन ही वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अपुरी ठरत असून, पावसाळ्याच्या काळात पाणी साचणे, घाण सांडणे, दुर्गंधी पसरने व आजारांचा धोका वाढणे अशा समस्या वारंवार उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर, सदर जुनी लाईन पूर्णपणे काढून टाकून तिच्या ऐवजी 18 इंच क्षमतेची नवीन आधुनिक ड्रेनेज लाईन बसविणे अत्यंत आवश्यक आहे