सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून राहुल साकोरे यांचा सन्मान

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून राहुल साकोरे यांचा सन्मान

MHADA मुख्याधिकारी राहुल साकोरे यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून सन्मान

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) पुणे विभागीय मुख्याधिकारी राहुल साकोरे यांची सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी संघाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी गृहनिर्माणाशी संबंधित विविध प्रश्न, पत्रकारांसाठीच्या योजना तसेच सर्वसामान्यांच्या हिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजय देशपांडे, संघाचे उपाध्यक्ष आफताब शेख, इंडिया टुडेचे विजयकुमार बाबर, दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक विजय गायकवाड, पुढारी न्यूज चॅनलचे अनिकेत गायकवाड, दैनिक पुढारीचे संगमेश जेऊरे, सिंहगड इन्स्टिट्यूटचे जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लांबतुरे, पत्रकार लक्ष्मीकांत शिंदे, KS न्यूजचे संदेश कांबळे आणि अनिल कांबळे उपस्थित होते.