नागपूरहून वृष्टी जैन यांची सोलापुरात एन्ट्री; शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती
KSNews सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे
IPS 2022 बॅचच्या अधिकारी वृष्टी जैन यांची सोलापूर शहर पोलीस उपायुक्त (DCP) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशिक्षण काळात त्यांनी वर्धा जिल्हा येथे कार्य करत प्रशासकीय अनुभव घेतला. त्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती उमरेड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून झाली होती.
कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या वृष्टी जैन यांच्याकडे आता सोलापूर शहर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या पोलीस प्रशासनात अधिक कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.