रणसम्राट सामाजिक संस्थेच्या वतीने खासदार ज्योतीताई वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
KS News सोलापूर प्रतिनिधी राज लोखंडे
रणसम्राट सामाजिक संस्थेच्या वतीने प्रा. डॉ. खासदार ज्योतीताई वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत संस्थेचे अध्यक्ष दिपक गायगवळी यांनी संस्थेच्या वतीने खासदार ज्योतीताई वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सोलापूरचे वाढते तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमात पिंपळ, वड, आंबा आणि जांभूळ यांसारख्या वृक्षांचे रोपण करण्यात आले असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही संस्थेच्या सदस्यांनी स्वीकारली.
या प्रसंगी मिलिंद ठोंबरे, राजू माने, मलिक शिंदे, ब्रम्हा श्रीमंगले, राघू नांदवार, गौतम साबळे, कपिल भालेराव, सादिक शेख, अश्विनी शिंगे, गिरीश उडानशिव, हर्षराज बनसोडे, प्रमोद मसलखांब, ॲड. सतीश गायकवाड, संजय कांबळे, नागसेन गायगवळी, भीमा गायगवळी, आशिष गायगवळी, भारत गायगवळी, स्वप्नील इसुरे तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.