औरंगाबाद पदवीधरमधून सतीश चव्हाणांना उमेदवारी

औरंगाबाद पदवीधरमधून सतीश चव्हाणांना उमेदवारी

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सतीश भानुदासराव चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

सतीश चव्हाण यांनी यापूर्वी २००८, २०१४ आणि २०२० मध्ये औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

चव्हाण यांच्या उमेदवारीबाबतचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्यात आल्याने औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला आता वेग आला आहे.