देशभक्त डॉ. रत्नापाण्णा कुंभार यांना अभिवादन
देशभक्त डॉ. रत्नापाण्णा कुंभार यांना अभिवादन
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने देशभक्त डॉ. रत्नापाण्णा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (१५ सप्टेंबर) अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका सभागृहात आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त रोशनी गोडे, रामचंद्र कांबळे, सहायक आयुक्त नितीन बनगे, नगरसचिव राहुल पोटे, सहायक कर संकलन अधिकारी दीपक खोत, क्रीडा अधिकारी संजय शेटे, भांडार अधीक्षक गणेश शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.