घोडेगावच्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात खुले ग्रंथालय उपक्रम

घोडेगावच्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात खुले ग्रंथालय उपक्रम
घोडेगावच्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात खुले ग्रंथालय उपक्रम
घोडेगावच्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात खुले ग्रंथालय उपक्रम

या उपक्रमातून विद्यार्थिनींना पुस्तकांशी संवाद साधण्याबरोबरच वाचनातून मिळालेले ज्ञान आणि विचार व्यक्त करण्याचा अनुभव मिळाला. ग्रंथालय मंत्र्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी घेतली.

यावेळी वसतिगृहाच्या गृहपाल रेणुका जाधव, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित करणे आणि ज्ञानाधिष्ठित व्यक्तिमत्त्व घडविणे यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.