ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांचा उद्या सन्मान सोहळा

ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांचा उद्या सन्मान सोहळा

ठाणे, दि. २६ : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम होणार आहे.

महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच महापालिकेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असून, यानिमित्त नाटिकेचे सादरीकरणही होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.