प्रबोधनकार ठाकरे जयंतीनिमित्त पनवेल महापालिकेत अभिवादन
पनवेल, दि. १७ सप्टेंबर २०२६
पनवेल महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी प्रबोधनकार ठाकरे जयंतीनिमित्त केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समाजसुधारक, पत्रकार, लेखक आणि समाजप्रबोधनकार म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांचे कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक व वैचारिक चळवळीत महत्त्वपूर्ण मानले जाते. अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक विषमतेविरोधात त्यांनी लेखणी व वक्तृत्वाच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांच्या जयंतीनिमित्त विवेक, समता आणि सामाजिक बांधिलकीच्या मूल्यांचे स्मरण करण्यात आले.
यावेळी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा, नगरसेवक गणेश कडू, सुमित झुंजारराव, कुसूम म्हात्रे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, शहर अभियंता राजेश कर्डिले, सहाय्यक आयुक्त बाळाराम रातांबे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.