प्रेमभावनेने बहरलेली ‘पिंगा रोज घालतो सखे’ ही कविता
✍️काव्य सुमन
पिंगा रोज घालतो सखे
जवा तुला पाहतो सखे lधृl
तू सोनकळी चाफा
मी सावळा भ्रुंगा गं
तुझ्या मागे मागे सखे
रोज घालतो पिंगा गं
पिंगा रोज घालतो सखे...
सखे चालता बोलता
चोरून पाहतो तुला गं
तुझ्या नजरेच्या खेळाचा
मला लागला लळा गं
पिंगा रोज घालतो सखे...
तुझ्या खळी गालवरी
तू दिसते चंद्र कळा गं
तुझ्या चंदेरी दुनियेत
जीव झाला खुळा गं
पिंगा रोज घालतो सखे...
तू तरू चंदनाचा
मी वेडा भुजंग गं
तुझ्या गोड गंधात
सखे झालो बेधुंद गं
पिंगा रोज घालतो सखे...
तू चांदण्यांची रात
मी चंद्राची साथ गं,
तुझ्या प्रितीच्या बंधात
सखे रंगली आपली प्रीत गं.
पिंगा रोज घालतो सखे
जवा तुला पाहतो सखे.
कवी :श्री. प्रशांत दिनकर पाटील
मो. 9029287263