राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मुंबईत महिला पत्रकारांचे राज्यस्तरीय संमेलन

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मुंबईत महिला पत्रकारांचे राज्यस्तरीय संमेलन

मुंबई (मुंबई प्रतिनिधी सौ रूपाली बैसाने): राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने राज्यभरातील विविध माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या महिला पत्रकारांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हे संमेलन पार पडणार आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात महिला पत्रकारांचे योगदान, त्यांना भेडसावणारी आव्हाने, बदलत्या काळातील पत्रकारितेचे स्वरूप, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आणि पत्रकारितेतील नव्या संधी अशा विविध विषयांवर या संमेलनात विचारमंथन होणार आहे.

राज्यभरातील वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या महिला पत्रकारांना आपले अनुभव व विचार मांडण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.

महिला पत्रकारांच्या कार्याचा सन्मान, त्यांच्या अनुभवांना व्यासपीठ आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रश्नांवर संवाद घडवून आणणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

या संमेलनासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकारांना सस्नेह निमंत्रण दिले आहे.