भव्य उत्साहात साजरी आंबेडकर जयंती : दृष्टीबाधित प्रशिक्षण केंद्रात प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

भव्य उत्साहात साजरी आंबेडकर जयंती : दृष्टीबाधित प्रशिक्षण केंद्रात प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

संदेश कांबळे ks news प्रतिनिधी सोलापूर 

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नॅब संचलित मा. सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. रामचंद्र कुलकर्णी (अधीक्षक, मा. सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात श्री. रियाज मुल्ला यांच्या प्रभावी प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थिनी दिपांजली केसकर हिने आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिवशरण गडदुरे व गुणानंद बिहाडे यांच्या गीतगायनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

अध्यक्षीय मनोगतात श्री. रामचंद्र कुलकर्णी यांनी शिक्षण, समता आणि स्वावलंबन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार पाटील यांनी सुरेखरीत्या केले, तर शेवटी शिवशरण गडदुरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीची आदरभावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमासाठी शुभम वांझरे व श्रीनिवास समदूर्ले यांचे विशेष सहकार्य लाभले.