आयुष्याचा आनंद साजरा करण्यासाठी वयाची सीमा नसावी - साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत

कोंढवे धावडे - कोंढवे धावडे गावातील सामाजिक कार्यकर्ते संत गाडगेबाबांचे थोर विचारक श्रीरंग गेनू गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा श्रावस्ती फाउंडेशन दिव्यांग मुला मुलींची शाळा येथे दिव्यांग मुलांना खाऊ व आरोग्य विषयक वस्तू वाटप करत साहित्यरत्न डॉ गणेश विठ्ठल राऊत ( शिवबांचा छावा ) संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला...
यावेळी जर आत्मीयता आणि इच्छाशक्ती असेल तर आयुष्याचा आनंद कधीही घेता येतो त्यासाठी वयाचं बंधन नसतं तो आनंद स्वतः घेत दुसऱ्यांना ही देण्यात ज्यांना धन्यता वाटते तेच विचारवंत दिव्यांगांसोबत अभिष्टचिंतन सोहळा साजरा करू शकतात तसाच वाढदिवस आज श्रावस्ती फाउंडेशन या ठिकाणी साजरा होताना पाहिला आणि खरंच एक प्रेरणा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांला मिळाली हे बोलणं वावगं ठरणार नाही.
श्रीरंग जी गायकवाड यांनी आपला वाढदिवसदिव्यांगांसोबत साजरा करत स्वतः त्यांच्यासोबत रमून गेले आणि वाढदिवसाची एक प्रेरणादायी कल्पना त्यांनी दिली असे मनोगत यावेळी डॉक्टर गणेश राऊत त्यांनी व्यक्त केले...
या कार्यक्रमाला संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट उपाध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष बांधकाम व्यवसायिक शिवाजी तात्या धावडे, सा. का. संतोष खिल्लारे, दिगंबरजी थोपटे, प्रकाश गायकवाड, राजू काशीद, व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते...
अतिशय प्रेरणादायी वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा केला गेला त्यामुळे संस्थेच्या वतीने संस्थापिका कांचनताई कदम यांनी मनस्वी आभार मानले...