ना. रामदास आठवले यांना "पॉलिटिकल एक्सिलेन्स अवॉर्ड प्रधान"
अहिल्यानगर ( विशेष प्रतिनिधी )
विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चा पॉलिटिकल एक्सिलेन्स अवॉर्ड पुरस्कार रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना राहुरी तालुक्यातील कणगर येथे प्रदान करण्यात आला आहे.
सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्या निमित्त रिपाई जिल्हा शाखेच्या वतीने राहुरी तालुक्यातील कणगर येथे रिपाई जेष्ठ नेते गोविंदराव दिवे यांच्या अध्यक्षतेखाली ना. आठवले यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर रिपाई राज्य सचिव विजयराव वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, प्रसिद्धी प्रमुख दीपक मेढे, जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, सुनील साळवे, युवा जिल्हा अध्यक्ष अमित काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चा पॉलिटिकल एक्सिलेन्स अवॉर्ड केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना १८४ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात पहिले भारतीय विनर्स बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष डॉ दीपक हरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रिपाई महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ. सीमाताई आठवले, दीपक मेढे आदी उपस्थित होते.