पुण्यात आरोग्य शिबिरात ३५४ रुग्णांची तपासणी

पुण्यात आरोग्य शिबिरात ३५४ रुग्णांची तपासणी
पुण्यात आरोग्य शिबिरात ३५४ रुग्णांची तपासणी
पुण्यात आरोग्य शिबिरात ३५४ रुग्णांची तपासणी

पुणे, दि. २४ : श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत भोसलेनगर हडपसर येथील युनिका सोसायटी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराला पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी कोथळीकर यांनी नागरिकांशी संवाद साधत शिबिरातील आरोग्य सुविधांची माहिती घेतली. त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून विविध तपासण्यांची माहिती घेतली. तसेच स्वतः हिमोग्लोबिनची तपासणी करून घेत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले.

शिबिरात सुमारे २५० सोसायटी सदस्य आणि गणेश मंडळाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रतिबंधात्मक आरोग्य, योग्य आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरात सर्वरोग निदान, हृदयरोग, कर्करोग, रक्त, नेत्र, दंतरोग आणि महिलांच्या आरोग्य तपासणीसह रक्तदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एकूण ३५४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

यावेळी अधीक्षक अभिजीत अनाप, जिल्हा न्यायाधीश गोसावी, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सागरराजे भोसले, वंशराजे भोसले, समर्थ सुरवसे आणि अमित जागडे उपस्थित होते.

श्री गणेशा आरोग्याचा अभियान १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यभर राबविण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. पुणे जिल्ह्यात अभियानाचे नियोजन व समन्वय डॉ. मानसिंग साबळे यांच्या माध्यमातून करण्यात आले.