कॅन्सर जनजागृती कार्यक्रमातून आरोग्याचा संदेश

कॅन्सर जनजागृती कार्यक्रमातून आरोग्याचा संदेश

पुणे, दि. २० जून २०२६ :कॅन्सरविषयी जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी संजीवनी – बियॉण्ड कॅन्सर यांच्या वतीने चैत्रबन, पीएमसी, अपर इंदिरानगर, प्रभाग क्र. ४८ येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे कॅन्सर चेतना जनजागृती कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला एकूण २७ नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे व संकेत, जोखीम घटक, कॅन्सर प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी, निरोगी जीवनशैली तसेच ताणतणाव व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

स्तन कर्करोगातून यशस्वीपणे मात केलेल्या एका महिलेने आपला प्रेरणादायी अनुभव सहभागींसोबत शेअर केला. त्यांच्या अनुभवातून उपस्थितांना सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला.

कार्यक्रमात सोनल मॅडम यांनी डीप ब्रीदिंगचा सराव करून घेतला, तर सुवर्णा मॅडम यांनी कॅन्सर प्रतिबंध व आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली.

उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चर्चेत सक्रिय सहभाग घेतला आणि आरोग्याबाबत उपयुक्त माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमासाठी सहकार्य व स्थळ व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. संजयजी वाघमारे आणि श्री. फुलचंद पायल यांचे विशेष आभार मानण्यात आले.

आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

कॅन्सरपासून बचावासाठी वेळेवर तपासणी, योग्य माहिती आणि निरोगी जीवनशैली आवश्यक आहे.