पनवेल मनपा मुख्यालयात पंडित नेहरूंना अभिवादन

पनवेल मनपा मुख्यालयात पंडित नेहरूंना अभिवादन

पनवेल : भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१४ नोव्हेंबर) पनवेल महानगरपालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या विकासाचा भक्कम पाया रचला. औद्योगिकीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकशाही मूल्यांच्या संवर्धनावर त्यांनी विशेष भर दिला. मुलांवरील प्रेमामुळे त्यांचा जन्मदिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो.

महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती डचे सभापती अजय बहिरा, सहायक आयुक्त बाळाराम रातांबे, सामान्य प्रशासन विभागप्रमुख कीर्ती महाजन, लिपिक विष्णू सांगळे, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक उपस्थित होते.