बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भिवंडी महानगरपालिकेत अभिवादन

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भिवंडी महानगरपालिकेत अभिवादन

भिवंडी, दि. १५ : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महानगरपालिका मुख्यालयातील तळमजल्यावर आयोजित कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त (आरोग्य) फैजल तातली यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागातील लिपिक फिरोज शेख यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.